बुलडाणा, दि. 24 : आदिवासी विकास विभागाच्या बुलडाणा येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अकरावी व पुढील शिक्षणाकरिता प्रथम वर्षासाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थिंनींना ऑनलाईन अर्ज swayam.mahaonline.gov.in
प्रवेशासाठी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता जातीचे वैधता प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, बुलडाणा शहरातील प्रवेश घेतलेल्या कनिष्ठ विद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, दहावीची गुणपत्रिका, फिटनेस मेडिकल सर्टीफीकेट, सन 2023-24चा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, स्वत:चे राष्ट्रीयकृत बँकेचे आधारसंलग्न बँक खाते पासबुक किंवा पोस्ट बँक पासबुकची झेरॉक्स. रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो आदी अचूकपणे ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
विद्यार्थिनींनी अर्जामध्ये स्वतःचा किंवा पालकांचा मोबाईल नंबर नोंद करावा. हा मोबाईल नंबर बँक खात्यासोबत, तसेच आधार क्रमांकासोबत लिंक केलेला असावा. ऑनलाईन अर्जामध्ये स्वतःचे नाव नोंदणी करताना ते आधार कार्डवरील नावाप्रमाणे तंतोतत असावे. आधार क्रमांकाची नोंद करताना तो स्थगित झाला नसल्याची खात्री करावी. विद्यार्थिनींनी ऑनलाईन अर्जामध्ये बँक खाते क्रमांकाची नोंद करण्यापूर्वी सदर बँक खाते सुरू असल्याची प्रत्यक्ष बँकेत जाऊन खात्री करण्यात यावी.
वसतिगृह प्रवेशाकरीता अधिक माहितीसाठी वसतिगृह कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
0 Comments