Ticker

6/recent/ticker-posts

नोंदणीकृत कुशल कामगारांना सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा: रविराज देशमुख

 



90 दिवस काम केलेल्या बांधकाम कामगारांना प्रमाणपञ देण्यात यावे !

रविराज देशमुख यांची सहाय्यक कामगार आयुक्तांशी चर्चा

*अमरावती प्रतिनिधी (दिनांक २९ जून २०२४):* 
महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या कामगारांचे भविष्य उज्वल होण्याकरिता महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारच्या योजना काढल्या आहेत आणि त्या योजनामध्ये बांधकाम कामगार योजना ही एक योजना आहे. या योजनेमार्फत बांधकाम करणाऱ्या कामगारांना रोजगार देणे, सामाजिक सुरक्षा देणे, कामगाराच्या मुलांचे शिक्षण करिता स्कॉलरशिप देणे, कामगाराच्या आरोग्यासाठी मदत देणे अशा अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना, महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार योजनेमार्फत सुरू केल्या आहेत. बांधकाम कामगार योजनेमार्फत कामगारांना आर्थिक मदत आणि जीवनावश्यक वस्तू सुद्धा दिल्या जातात. त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकार दरवर्षी कामगारांना बांधकाम कामगार पेटी योजनेमार्फत पेटी (सेफटी किट) सुद्धा देतात. या पेटीमध्ये तुमच्या सुरक्षेसाठी विविध प्रकारच्या वस्तू दिल्या जातात. या वस्तूंच्या फायदा तुम्ही काम करताना घेऊ शकतात. बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत तुम्हाला पेटी घ्यायची असेल तर, तुमचे नाव बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदलेले असणे आवश्यक आहे.  कामगाराने मागील वर्षांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे, अशा अनेक पात्रता बंधनकारक आहे. त्यामुळे अशा कामगारांना या योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी ग्रामीण स्तरावरील बांधकाम कामगारांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपञ देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे, यासाठी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविराज देशमुख यांनी सहाय्यक कामगार आयुक्त यांची भेट घेऊन पत्र दिले व सकारात्मक चर्चा केली. आणि लवकरात लवकर कामगारांना न्याय द्यावा, अशा सूचना दिल्या.
                              त्याचबरोबर बांधकाम मजूरांची नोंदणी होण्यासाठी नोदंणीकृत अधिकृत दस्तऐवज ग्रामपंचायत कडे उपलब्ध करून देण्यात यावे. ग्रामीण स्तरावर सरसकट बांधकाम मजूरांचे दाखले दिल्यामुळे खोट्या तक्रारी केल्या जात असून ब्लकमेलींगचे प्रकार वाढले आहे , बांधकाम कामगार व ग्रामसेवक यांना कोणत्याही प्रकारचा ञास होऊ नये, त्यासाठी आपल्या कार्यालयाकडून योग्य ती नियमावली प्रसिद्ध करण्यात यावी तसेच कामगारांना साहित्य वाटप ताबडतोब करण्यात यावी, तसेच नोंदणीकृत कुशल कामगारांना सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना सुद्धा यावेळी रविराज देशमुख यांनी दिल्या. यावेळी मनोज खवड (भाजपा वलगाव शहर अध्यक्ष), संदिप खोड (ग्रामसेवक), सचिन इंगळे (पश्चिम विदर्भ युवक संपर्क प्रमुख), अमित बाभुळकर (भाजपा तिवसा शहर अध्यक्ष), ऋषिकेश ढेपे, अक्षय पुंडेकर, स्वराज गाडे, मोहन मुंदाने आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments