नवी दिल्ली | कोरोना महामारीपासून नागरिकांच्या बचावासाठी शासनाकडून लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. इतर व्यक्तींप्रमाणे गर्भवती महिलांना कोरोनाची लस कितपत सुरक्षित आहे, याविशयी आता शंका वर्तविली जात आहे.
अशातच नीतीआयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी याबाबतचा संभ्रम दूर केला आहे. गरोदर महिलांच्या लसीकरणाविषयी बोलतांना ते म्हणाले, ही लस घेतल्यानं गरोदर महिला आणि बाळ सुरक्षित असेल.
आतापर्यंत पुढे आलेल्या आकडेवारीनुसार ही लस गरोदर महिल्यांसाठी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे गरोदर महिलांनी कोरोनाची लस घ्यावी, असं आवाहन नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
गरोदर महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्यास वेळेआधी प्रसुती होण्याची शक्यता जास्त आहे. असं एका अभ्यासातून समोर पुढे आले आहे, असंही यावेळी ते म्हणाले.
कोरोना लस सुरक्षित असून कोरोनापासून ती गर्भवती महिलांचे संरक्षण करते. कोणत्याही औषधाप्रमाणे, लसीचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात, जे सहसा सौम्य असतात. त्यात सौम्य ताप येणे, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होणे किंवा लसीकरण केल्यानंतर 1-3 दिवसांपर्यंत अस्वस्थता जाणवणे. या सर्व गोष्टी आरोग्य मंत्रालयाने आधीच आपल्या नव्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सांगितले, असंही ते म्हणाले.
0 Comments