नवी दिल्ली | यंदा कोरोना महामारीमुळे सर्वच परीक्षांचे गणित बिघडले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कित्येक परीक्षा अजूनही लांबणीवर आहेत. अशातच आता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.
त्यानुसार पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. एमडी, एमएस किंवा पीजी डिप्लोमा अशा अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी NEET PG परीक्षा ही येत्या ११ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे मनसुख मांडवीय यांनी जाहीर केले आहे.
मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करत या परीक्षेबद्दल माहिती दिली आहे. आम्ही 11 सप्टेंबर 2021 रोजी NEET पदव्युत्तर परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. सर्व तरुण वैद्यकीय परीक्षार्थींना माझ्या शुभेच्छा, असं देखील मांडवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मांडवीय यांनी केलेल्या या घोषनेनंतर पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षांची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर त्यांची रखडलेली वाट स्पष्ट झाल्याचे दिसत आहे.
या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार की ऑफलाईन याबद्दल अजून काही माहिती देण्यात आलेली नाही. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षा कशाप्रकारे होतील, परिक्षेचे स्वरुप कसे असेल याबद्दल लवकरंच घोषणा होण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/mansukhmandviya/status/1414922541748035590?s=19
0 Comments