पेठ - दि. ०६ / जून २०२१ रोजी ग्रामपंचायत पेठ येथे शिवराज्याभिषेक (स्वराज्यभिषेक) दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या वर्षीप्रमाणेच गेल्या वर्षीही शिवराज्याभिषेक दिनावेळी राज्यात कोरोनाचे संकट होते.
कोरोना संकट काळात पार पडणारा हा दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा असेल.असे विदर्भदूत जि, प्रतिनिधी मनोज जाधव यांनी सांगितले , बोलताना ते बोलले।आज शिवराज्याभिषेक दिवस. आजच्याच दिवशी १६७४ला किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला. हा सोहळा तब्बल ९ दिवस सुरू होता.
शिवरायांचा हा राज्याभिषेक सोहळा म्हणजे भारताच्या इतिहासातलं एक सुवर्ण पानआहे. सरपंच विष्णुपंत शेळके यांनी त्यांच्या भाषणातून छत्रपती शिवरायांच्या विचारांवर आपण चाललो पाहिजे शिवरायांची कीर्ती महान होती त्यानी आपल्या रयतेची , त्यांच्या रक्षणासाठी स्वराज्याची स्थापना केली.
सरपंच विष्णुपंत शेळके , उपसरपंच भगवान गायकवाड , विदर्भ दूत जि, प्रतिनिधी मनोज जाधव ,कडूबा टेंगसे ग्रा. सदस्य , ज्ञानेश्वर शेळके ग्रा. सदस्य , यांनी गुढी उभारून छत्रपतींना अभिवादन केले .कार्यक्रमाला उपस्थित यादव मामा, विठ्ठल शेळके, राजेंद्र पांढरे, शिवा यादव, विष्णू डुकरे, संतोष गवई, अमोल शिंगणे, व गावातील काही नागरिक उपस्थित होते .
राष्ट्रगीत व जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गाऊन रयतेच्या राजाला वंदन केले. कार्यक्रम संपल्यावर सरपंच विष्णुपंत शेळके यांनी (ग्रामसेवक) समाधान पडघानयांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
0 Comments