रयत क्रांती संघटनेच्या मागणीला यश
जिल्हाध्यक्ष श्री.तुषार काचकुरे यांनी केला पाठपुरावा
Buldhana- सध्या कोरोना या महामारीने संपुर्ण जग आरोग्यविषयक संकटात सापडले आहे. यात अनेकांचे जीव गेले अनेक लोक मृत्यशी झुंज देत आहेत.या महामारी विरोधात लढण्यासाठी शासनाने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी व्यवस्था केली आहे. सोबतच काही खाजगी रुग्णालयांना कोविड सेंटर म्हणून मान्यता देऊन त्यात जनसामान्यांचे इलाज करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मात्र काही खाजगी रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली सामान्य नागरिकांची लुट होत असल्याचे प्रकार झाले लाखोंची बिले त्यांच्या हाती देण्यात आली यामुळे नागरिक त्रस्त झाले ही बाब लक्षात येताच रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.तुषारभाऊ काचकुरे यांनी एका निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी मा.श्री.गीते साहेब यांचेमार्फत मा.जिल्हाधिकारी यांच्या ही बाब लक्षात आणून देऊन याबाबत उपाय करण्याचे आवाहन करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी तातडीने याबाबद अधिकाऱ्यांची बैठक बोलावून उपाय म्हणून व या खाजगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठीशासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. तुषारभाऊ काचकुरे यांनी याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले असुन सामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की खाजगी कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नागरीकांनी रुग्णालयाची बिले अदा करण्यापूर्वी बिल जास्त व अवाढव्य वाटल्यास समंधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करवा असे आवाहन रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात आले आहे.
0 Comments