आयुर्वेदात लवंगाचा उपयोग अनेक वर्षापासून केल्या जात आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील लवंग खाणे हे गुणकारी असल्याचे सांगितले जाते. परंतु अजूनही अशी बरीच मंडळी आहेत, जे याच्या फायद्यापासून अनभिज्ञ आहे.
लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातदुखी सारख्या समस्येवर रामबाण उपाय आहे. लवंग ही गरम असते. यामुळे सर्दी-खोकला झाल्यावर लवंग खावी किंवा चहात लवंग पावडर किंवा लवंग टाकून पिण्याचा सल्ला घरातील मोठ्या व्यक्तींकडून दिल्या जातो.
सर्दी, खोकला आणि कफ असल्यास घरगुती औषध म्हणून अनेक घरांत लवंगचे चाटन सहदाबरोबर देण्यात येते.
सध्याच्या संक्रमणाच्या काळात वेगवेगळ्या काढ्यांत लवंगाचा वापर केल्या जात आहे. लवंगमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास देखील मदत होते. लवंगेचे तेल सर्दीकरिता अत्यंत उपयुक्त आहे. रुमालावर दोन थेंब तेल टाकले की, नाकाद्वारे त्याचा सुगंध घेतांना नाक मोकळे होते. वजन कमी करण्यासाठी लवंगीचा चहा अत्यंत फायदेशीर ठरतो.
परंतू लवंगाचा जास्त वापर करणे आरोग्यासाठी चांगले नसल्याचेही आयुर्वेदात सांगितले आहे. अतिशय जास्त प्रमाणात वापर केल्यास डोळे, मूत्राशय व हृदयावर याचा वाईट परिणाम होतो. त्यासोबतच तोंडाला बारीक फोड येणे, जिभेला जखम होणे, पोटदुखी देखील होऊ शकते. गर्भवती आणि स्तनपान करणा-या महिलांनी लवंगाचे जास्त सेवन करू नये.
0 Comments