शेवटच्या क्षणी मारली पतीच्या मृतदेहाला मीठी
पाटणा | पतिव्रता असलेल्या सावित्रीने यमापासून आपल्या पतिचे प्राण परत आणले. ही कथा आपण कधी न कधी ऐकली असेलच. पत्नीचे आपल्या पतीवर अफाट प्रेम असले की ती त्याच्यासोबत आयुष्य घालविण्यासाठी कुठलही संकटाशी सामना करते.
पण प्रत्येक वेळी सावित्री ही जिंकतेच असे नाही. कारण या जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक दिवसं जग सोडून जावं लागतं.
बिहारच्या भागलपूरमधील कहलगावात एका वृद्ध शेतक-याचा नैसर्गिक मृत्यू झाला. यावेळी त्यांचे वय जवळपास 100 वर्षे होते. पतीच्या निधनाची बातमी पत्नीला कळताच 90 वर्षीय पत्नीनेही पतीच्या पाठोपाठ आपले प्राण सोडले.
कहलगावात घडलेल्या या घटनेने वृद्ध दाम्पत्यांचे एकमेकांवर जीवापाड असलेले प्रेम दिसून येते. जागेश्वर मंडल असे त्या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव असून सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
सकाळी पतीच्या निधनाबद्दल कळताच रुक्मिणी देवी त्यांच्या मृतदेहाजवळ गेल्या. आपल्या पतिला त्यांनी घट्ट मिठी मारली आणि त्यांनीही या जगाचा निरोप घेतला.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघंही वयोवृद्ध गरीब होते. पण ते दोघेही मनाने फार श्रीमंत होते. त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. त्यामुळे त्यांचात कधीही वादविवाद होतांना बघितले नाही. त्यांच्या मृत्यूमुळे आमचे मायेचे, आपुलकीचे छत्र हरवले आहे, असंही ते म्हणाले.
0 Comments