इतरांसाठी ठरल्या त्या प्रेरणादायी
मुंबई | कोरोनाने अनेकांचे कुटूंब उध्वस्त केले. आणि अजूनही मृत्यूचा हा पोरखेळ सुरूच आहे. मृत्यूचा हा वाढता क्रम कुठेतरी थांबावा यासाठी फक्त आरोग्य सेवा देणारे सेवकच नाही तर पोलिस यंत्रणा आणि इतर यंत्रणा देखील आपले प्राण पणाला लावून कार्य करत आहेत. आपल्या पतिच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसातच पत्नी कामावर परतली, असं ऐकलं तर एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी असं वाटेल. परंतू सत्य परिस्थितीत असे घडले आहे.
मनीषा रेगो या खासगी प्रसूती रूग्णालयात डॉक्टर म्हणून सेवा करतात. तर त्यांचे पती झेवियर रेगो हे मुंबईत पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. 1993 मध्ये मुंबईच्या पोलीस दलामध्ये ते दाखल झाले होते.
दोघेही कोरोना काळात आपले कर्तव्य बजावत होते.
अश्यातच त्यांच्या पतीचे कोरोनाने अचानक निधन झाल्याने त्यांना धक्का बसला, पण तरी देखील त्या खचल्या नाहीत. देशासाठी सेवा देण्याचं आपलं काम त्यांनी पुन्हा सुरू केलं. आपला क्वारंटाईनचा कालावधी पुर्ण करत त्या पुन्हा सेवेवर रुजू झाल्या.
मला थांबून चालणार नाही. रूग्णांना माझ्यासारख्या अनेक डॉक्टरांची गरज आहे. गर्भवती महिलांना तर याची गरज अधिक आहे. जगावर जे संकट आलं आहे, त्याचं भान ठेवून सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. कोरोनाच्या या भीषण संकटातून आपण लवकर मुक्त होवु, असा विश्वासही मनीषा यांनी व्यक्त केला.
0 Comments