मुंबई महानगरीत अनेक लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. रातोरात माणसाचं नशीब चमकवणा-या या मुंबईत, कधी कुणाचं नशीब लवकर उजळतं तर कधी अनेक वर्ष प्रयास करून देखील अनेकांना खटका खाव्या लागतात. वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नशीब आजमावू पाहणारे अनेक व्यक्ती मुंबईत येतात.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, अशाच एका व्यक्तीबद्दल ज्याने प्रयत्नांची पराकाष्टा करत मुंबई गाठली. मुंबईत रात्रंदिवस कष्ट करत, त्याने अशा एका व्यवसायात हात मारला की, ज्या व्यवसायाने त्याचं भाग्यच बदलून टाकलं. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून मटका किंग रतन खत्री होय.
मटका हा प्रकार अनेकांचे संसार उध्वस्त करणारा असला तरी, याच मटक्याने अनेकांना मालामाल देखील केलेले आहे. या खेळाने रातोरात कुणी करोडपती झाले तर रातोरात कोणी रस्त्यावर देखील आले. 1960 च्या दशकात या क्षेत्रात फक्त दोनच नावे होती. ती म्हणजे कल्याण भगत आणि रतन खत्री.
1950 आली कल्याण भगत ने मटका या काळ्या धंद्याचा शोध लावला. तर रतन खत्री या व्यक्तीने या धंद्याचा प्रसार केला. सुरूवातीला हे दोघंही एकत्र होते, नंतर मात्र काही कारणाने ते वेगळे झाले.
रतन खत्री हा मूळचा पाकिस्तान मधील कराचीचा. ज्यावेळी भारत पाकिस्तानची फाळणी झाली, त्यावेळी तो भारतात आला. मुंबईत आल्यावर त्याने अनेक उद्योगधंद्यात आपले नशीब आजमावले, पण त्याला यश आले नाही. मात्र कल्याण भगत सोबत झालेल्या भेटीनंतर त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.
गुजरातमधील कच्छ येथील असलेला कल्याण भगत 1941 साली मुंबईत आला. त्याने सुद्धा अनेक कामात स्वतःला गुंतवून जीवाची पराकाष्ठा केली. परंतु तरीही त्याला यश आले नाही. शेवटी त्याने बेटिंगची बुकी म्हणून काम करायला सुरुवात केली.
त्यावेळी कॉटन मार्केटच्या उघडण्यावर आणि बंद होण्यावर तो बेटिंग बुकी म्हणून काम करत होता. 1960 च्या दशकात मटका अतिशय प्रसिद्ध होता. परंतु 1962 मध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजने त्याची प्रक्रियाच बंद केली. या घटनेने मटक्याचा धंदा देखील बंद होण्याच्या मार्गावर आला होता.
परंतू अत्यंत हुशारीने यावर तोडगा काढत, रतन खत्री याने मटका सुरू ठेवून त्याचे स्वरूप बदलले. खत्रीने इतर गोष्टींवर देखील बोली लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे मटक्याचा धंदा पुन्हा एकदा तेजीत आला आणि रतन खत्री हा भगत पासून वेगळा होऊन मटका किंग झाला.
मटक्याच्या धंद्यामुळे रतन खत्री ला तुरुंगवास देखील झाला होता. परंतु तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने परत एकदा धंदा करण्यास सुरुवात केली. त्याने राज्य शासनाच्या लॉटरी प्रमाणे स्वतःची लॉटरी देखील सुरू केली होती.
अशा या मटका क्षेत्रातील बादशाहाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या जाण्याने मटका क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
0 Comments