मुंबई | कोरोनाचा कहर संपता संपत नाही. आता हा कहर तरूणांना झपाट्याने आपल्या तावडीत खेचून घेत आहे. या आजाराने ग्रासलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने लढतो आहे. पण तरीसुद्धा काहींना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागत आहे.
32 वर्षीय IRS अधिकारी अनंत तांबे यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झालं आहे. औरंगाबादमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अवघ्या 32 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे. अनंत तांबे हे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे अतिरिक्त खाजगी सचिव म्हणून काम पाहत होते.
त्यांच्या निधनानंतर मंत्री जावडेकर यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत, शोक व्यक्त केला आहे.
श्री. तांबे यांच्या अचानक आणि अकाली निधनाचे मला फार दु:ख आहे. कोविडमुळे वयाच्या 32 व्या वर्षी अनंत तांबे यांचे निधन झाले. ते एक तरुण आणि तेजस्वी आयआरएस अधिकारी होते. त्यांना कोरोनाने हिरावून घेतल्याचं मला दु:ख आहे. माझ्या प्रार्थना त्याच्या कुटुंबासमवेत आहेत, असं मत आपल्या ट्विटद्वारे प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे.
0 Comments