Ticker

6/recent/ticker-posts

पंक्चर काढून, 90 सिलिंडर देणारा तो 60 वर्षीय ऑक्सिजन मॅन


Oxygen Cylinder


भोपाळ | कोरोनाने अनेकांना बेरोजगार केलं, तर कुठे अनेकांचा जेवता घास हिरावून घेतला. या काळात अनेकांनी आपल्यापरीने कुणाला दोन वेळचे जेवण दिले तर कुणाला आर्थिक मदत केली. अजूनही असे मदतीचे हात वेगवेगळ्या गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी पुढे येत आहे. 


कारण कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता रेमडेसिवीर, बेड्स, कोरोना लस यांच्यासह ऑक्सिजनचा मोठा तुडवटा निर्माण होतो आहे. याच पार्श्वभूमीवर समाजसेवेची ओढ असलेल्या एका 60 वर्षीय व्यक्तीने तब्बल 90 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले आहे. 


ही व्यक्ती कुठलीही व्यावसायिक किंवा श्रीमंत घरची नसून मध्य प्रदेशमधील श्योपूर भागात गाड्यांचे पंक्चर काढणारी व्यक्ती आहे.


पंक्चर काढण्यासोबत त्यांचे ऑक्सिजन पुरवठा करण्याचा छोटा व्यवसायही आहे. ते नेहमीच आपल्याकडून होईल तितकी मदत करण्यास तत्पर असतात. 


त्यांनी दिलेले ऑक्सिजन सिलिंडर ग्वाल्हेर आणि भिंड येथे पाठवले आहेत. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या अन्य व्यापाऱ्यांकडूनही मदत दिली जात आहे. या सिलिंडरचा उपयोग जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रभावीपणे केला जात असल्याचं, श्योपूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं.


त्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या भागात ऑक्सिजनची कमतरता असल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान, त्यांनी तातडीने 90 ऑक्सिजन सिलेंडर जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिले. मी सक्षम असल्यामुळे प्राण धोक्यात असलेल्या लोकांना मदत करू शकलो. मी फक्त सत्कार्यात माझं योगदान दिलं, असंही रियाज यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments