Ticker

6/recent/ticker-posts

कोविड सेंटरमध्ये मुक्काम करणारा आमदार...आपण बघितला का?



अहमदनगर | कोरोना काळात परिस्थिती बिकट असल्याने अनेक व्यक्ती आपल्याला करता येईल तेवढी मदत करण्यासाठी पुढे येत आहे. आरोग्य विभाग, शासन, प्रशासन हे देखील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नरत आहे. 


अनेक लोकप्रतिनिधी देखील जनतेच्या कल्याणासाठी तत्परतेने कार्य करत आहेत. कुठे कोविड सेंटर उभारण्यासाठी, कुठे त्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी तर कुठे ऑक्सिजन तातडीने मिळावे यासाठी हे लोकप्रतिनिधी कोरोना योद्धांप्रमाणे कार्य करत आहेत. अश्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांंच्या एक फोटोची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.


कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेता आमदार निलेश लंके यांनी जनहिताचा विचार करून 1100 बेड्सचे कोविड सेंटर उभारले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने हे कोविड सेंटर असून ते दोन ठिकाणी उभारण्यात आले. 


या कामाची अख्ख्या महाराष्ट्राने दखल घेतली होती. या सेंटरमध्ये जेवणाची आणि उपचाराची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय हे सेंटर उभारण्यासाठी लंके यांनी खूप मेहनत देखील घेतली होती. 


आता पुन्हा एकदा सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या फोटोने निलेश लंके हे चर्चेचा विषय ठरले आहेत. अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्या सहका-यांसमवेत ते कोविड सेंटरमध्ये झोपलेले दिसत आहेत. आमदारकीचा कुठलाही मोठेपणा न दाखवता ते शांतपणे फोटोत आराम करतांना दिसून येत आहे. 


अहमदनगरमध्ये उभारलेल्या या कोविड सेंटरची महाराष्ट्रभर चर्चा तर होतंच आहे. पण स्वतः शरद पवारांनी देखील निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments